'युती झाली नाही तरी...'; राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:42 AM2021-08-06T11:42:18+5:302021-08-06T11:58:58+5:30

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची ...

BJP leader Chandrakant Patil has said that even if there is no alliance with MNS, there will be friendship | 'युती झाली नाही तरी...'; राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

'युती झाली नाही तरी...'; राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

googlenewsNext

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला. त्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि  चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे. भेटीत विचारांचे आदान-प्रदान होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ''युती झाली नाही तरी मैत्री राहील'', असं भेटीच्या आधी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. 

माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत. त्यानंतर, पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होत. त्यानुसार, ही भेट होत आहे. 

मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. मी ती क्लीप शांतपणे ऐकली, त्यामध्ये उत्तर भारतीय पुरोहितांनीही राज ठाकरे यांचा सत्कार केला आहे. ही क्लीप पाहिल्यानंतर त्यातील मुद्द्यावर चर्चा करायची आहे, असे पाटील यांनी म्हटलं होतं. 

राज ठाकरे यांची भूमिका 

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली असताना त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपासोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. 

Web Title: BJP leader Chandrakant Patil has said that even if there is no alliance with MNS, there will be friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.