मुंबई: विधासभेचे विशेष अधिवेशन आज बोलविण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. तसेस मी पुन्हा येईन असं सांगितले पण टाइमटेबल सांगितलं नव्हतं म्हणून काही वेळ वाट बघा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगवाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सत्ताधारी एका शायरीच्या माध्यमातून सत्ताधारी नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा'' असं म्हणत त्यांनी विरोधाकांना प्रत्युत्तर दिले. त्याचप्रमाणे विरोधी पक्षात काम करणं हा आमचा डीएनए आहे. जनतेच्या हिताचं काम करण्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करु असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हेच आहेत. छत्रपतींचे सेवक म्हणूनच आम्ही काम केले. बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावं वंदनीयच आहेत. ही नावं कधीही घ्या, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात शपथ घेताना जी तरतूद केली आहे. त्या अनुसरुन शपथ घ्यायला हवी होती. पण शपथ घेताना संविधानाची तरतूद पाळली नाही. जेव्हा जेव्हा नियमाला धरुन काम होणार नाही. कितीही चिडला, कितीही रागवला तरीही मला दिलेली जबाबदारी ही नियमाला धरुन, संविधानाला अनुसरुन काम करत राहणार आहे असं सांगत फडणवीसांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले.
मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर मंत्र्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांची नावं घेतली, मग देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पोटात का दुखलं असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आम्ही आमच्या दैवतांची नावं घेतली, त्यानंतर राज्यपालांनी दिलेली शपथ जशीच्या तशी वाचली. त्यामुळे भाजपाने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनतेने मजबूत विरोधी पक्ष दिला आहे. मात्र त्यांनी विरोध न करता सभागृह बाहेर निघून गेल्याचे देखील छगन भुजबळ यांनी शनिवारी सभागृहाच्या भाषणात सांगितले होते.