Join us

मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज; देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, गिरीष महाजनांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 8:50 PM

मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं मत भाजपाचे नेते गिरीष महाजन यांनी व्यक्त केलं आहे. 

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आषाढी वारीच्या वेळीही एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता पीएफआयवर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारची धमकी आली आहे. या अनुषंगाने पोलीस आता तपास करत आहेत. याचदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं मत भाजपाचे नेते गिरीष महाजन यांनी व्यक्त केलं आहे. 

धमकीच्या फोनवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच सदर प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमात वावरत आहे. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोक इतके अंगावर येतात की, त्यावर कठीण होऊन जाते, असं गिरीष महाजन यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या महिन्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यासंबंधीही पोलिस तपास करत आहेत. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीवरहोणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील, अशी माहिती मिळत आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेगिरीश महाजनदेवेंद्र फडणवीस