Join us

'तुम्ही अहंकारातून मुंबईकरांच नुकसान करीत आहात'; मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भाजपाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 3:05 PM

बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ठ आहे, अशी टीका देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच आजच समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती आणि उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण होते. गेले वर्षभर सरकार विकास करीत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ जी चार उदाहरण दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती, असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले आहे. 

मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे. त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उध्दव ठाकरे सरकारने नेमलेल्या मनोज सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आले असते, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

अभिमान आणि अहंकार यात अंतर असते. मुंबई बद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून आपण मुंबईकरांच नुकसान करीत आहात. ज्या कांजूरमार्गचे समर्थन आपण करत आहात तिथे कारशेड होण्यातल्या अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूरचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही. मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता इतरत काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ठ आहे, अशी टीका देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारमेट्रो