३५ मिनिटं, १० माणसं...; विक्रांतवर सोमय्यांचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी शोधली १४० कोटींची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:42 PM2022-04-08T12:42:36+5:302022-04-08T12:50:34+5:30

सोमय्या म्हणाले तो प्रतिकात्मक निधी; नेटकऱ्यांनी त्यांचीच ९ वर्षे जुनी पोस्ट दाखवली

bjp leader kirit somaiya clarifies over ins vikarant netizens comes up with 9 year old post | ३५ मिनिटं, १० माणसं...; विक्रांतवर सोमय्यांचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी शोधली १४० कोटींची पोस्ट

३५ मिनिटं, १० माणसं...; विक्रांतवर सोमय्यांचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी शोधली १४० कोटींची पोस्ट

Next

मुंबई: आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सोमय्या राजभवनात निधी गोळा करणार होते. तो निधी गेला कुठे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर प्रतिकात्मक निधी जमवल्याचं स्पष्टीकरण सोमय्यांनी दिलं. यानंतर आता सोमय्यांची २०१३ मधली एक फेसबुक पोस्ट नेटकऱ्यांनी शोधून काढली आहे.

केवळ ३५ मिनिटंच निधी गोळा केला- सोमय्या
आयएनएस विक्रांतसाठी केवळ ३५ मिनिटंच निधी गोळा केल्याचं स्पष्टीकरण सोमय्यांनी दिलं. विक्रांतसाठी १० डिसेंबर २०१३ रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता. ३५ मिनिटं मी निधी गोळा केला. जेमतेम १० लोकांनी डब्यात पैसे टाकले. अवघ्या ३५ मिनिटांत इतका निधी कसा काय गोळा होऊ शकतो. काँग्रेसनंदेखील भीक मांगो आंदोलन केलं होतं. त्यातून त्यांनी किती पैसे गोळा केले, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.

सोमय्यांनी मुंबई पोलिसांनी विक्रांतप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरवरदेखील राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पोलिसांनी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे एफआयआर कसा दाखल केला? एकही पुरावा नसताना एफआयआर कसा नोंदवला?, असे प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केले. राऊत आरोप करतात. त्यांनी याआधी माझ्यावर १७ आरोप केले. मात्र पुरावे दिले नाहीत, असंदेखील सोमय्या म्हणाले.

नेटकऱ्यांनी शोधली ८ वर्षे जुनी पोस्ट
किरीट सोमय्यांची ८ वर्षे जुनी फेसबुक पोस्ट काहींनी शोधून काढली आहे. ती व्हायरलदेखील झाली आहे. यामध्ये सोमय्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचा उल्लेख आहे. 'राज्यपालांच्या भेटीत आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याची विनंती केली. विक्रांत शहीद स्मारक संग्रहालयासाठी मुंबईकर १४० कोटी जमवतील, असं सोमय्यांनी राज्यपालांना सांगितलं,' असा मजकूर या पोस्टमध्ये आहे.

Web Title: bjp leader kirit somaiya clarifies over ins vikarant netizens comes up with 9 year old post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.