संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यास किरीट सोमय्या सज्ज; उद्या थेट दिल्लीत पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:06 PM2022-02-15T23:06:18+5:302022-02-15T23:06:24+5:30

भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त

BJP leader Kirit Somaiya will hold a press conference in Delhi on February 16 to reply to Shiv Sena. | संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यास किरीट सोमय्या सज्ज; उद्या थेट दिल्लीत पत्रकार परिषद

संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यास किरीट सोमय्या सज्ज; उद्या थेट दिल्लीत पत्रकार परिषद

Next

मुंबई: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.

पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या टीकेनंतर आता किरीट सोमय्या देखील थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार आहे. 

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, संजय राऊत यांनी आज केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे दिल्लीमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या उत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला-

माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता, असं राऊतांनी सांगितलं.

मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार-  

देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा  आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं १२ हजार कोटींची जागा १०० कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.

Web Title: BJP leader Kirit Somaiya will hold a press conference in Delhi on February 16 to reply to Shiv Sena.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.