"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:53 AM2024-09-18T10:53:42+5:302024-09-18T10:59:25+5:30

Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले.

bjp leader mangal prabhat lodha says i will call amruta fadnavis maa not madam | "मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 

"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 

मुंबई : गणेश विसर्जनानंतर दरवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. यंदाही गणेश विसर्जनानंतर दिव्याज फाउंडेशनच्यावतीने बुधवारी (दि.१८) वर्सोवा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 

बुधवारी सकाळी अमृता फडणवीस समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी वर्सोवा येथे पोहोचल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मंडळी उपस्थित होती. यादरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले.

आपण मुंबईतील चौपाटीवर असलेला कचरा साफ करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेता. पण आता आपण राज्यातील राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी सुद्धा पुढाकार घ्यायला हवा, अशी मी आपणास विनंती करतो. अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यामुळं मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेन, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. त्यामुळे नेहमी कोणत्या-ना-कोणत्या कारणावरून चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

क्षेत्र काणतंही असो स्वच्छता हवी - अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांनी म्हटले की, आपण शहरं, नद्या, समुद्र स्वच्छ ठेवायला पाहिजेत. आपण ते स्वच्छ राहतील याची काळजी घेऊन तेव्हाच आपली आर्थिक प्रगती साधू. कोणत्याही प्रकारची आर्थिक प्रगती साधण्यासाठी आधी आपण आपली शहरं स्वच्छ ठेवायला हवीत. आपण देव, धर्म मानणारे लोक आहोत. देवाला स्वच्छता आवडते. त्यामुळे क्षेत्र कोणतंही असो, आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. मग ते राजकारण असो किंवा आपले मन. कोणत्याही सेक्टरमध्ये काही ना काही घाण असते. त्यामुळे आपण स्वच्छतेवर भर द्यायला हवा. कॉर्पोरेट असो की पॉलिटिक्स आपण सर्वत्र स्वच्छता ठेवायला हवी, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.
 

Web Title: bjp leader mangal prabhat lodha says i will call amruta fadnavis maa not madam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.