Narayan Rane : शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत, नारायण राणेंचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 11:43 AM2022-02-19T11:43:48+5:302022-02-19T11:43:54+5:30

बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत : नारायण राणे

bjp leader minister narayan rane speaks about notice on his house mumbai criticize shiv sena bmc | Narayan Rane : शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत, नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane : शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत, नारायण राणेंचा हल्लाबोल

googlenewsNext

"घराबद्दल नोटीस मिळाली असं मला अनेकांनी विचारलं. जे काही वास्तववादी चित्र आहे ते सांगावं असं मी ठरवलं. या घरात मी १७ सप्टेंबर २००९ मध्ये आलो. ही इमारत नामांकित आर्किटेक्टनं बांधली. या इमारतीला ऑक्युपेशन, कम्पलिशन सर्टिफिकेट महापालिकेनं दिल्या होत्या. घर घेताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. घर घेतल्यानंतर एक इंचही अधिक बांधकाम करण्यात आलेलं नाही. आम्ही या घरात ८ माणसं राहतो. ही १०० टक्के रहिवासी इमारत आहे. १०० टक्के कायदेशीर इमारत असताना शिनसेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार करायला लावण्याचं काम केलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्यानं तक्रारी करायच्या आणि तपासून काही अनधिकृत नाही असंही सांगायचे" अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत. मी सैनिक, पदाधिकारी म्हणणार नाही. त्यांनी मातोश्री १ दुरुस्त केला. मातोश्री २ बांधला, आम्ही काही म्हणालो नाही. सत्ता असताना त्यांनी त्यांनी पैसे भरुन बेकायदेशीर रेग्युलराईज करून घेतलं. दोन्ही घराचे प्लॅन माझ्याकडे आहेत. परंतु मी कधी कोणाच्या घरावर किंवा नोकरीवर काहीही बोललो नाही," असं राणे यावेळी म्हणाले.

"राजकीय सुडबुद्धीनं अशा प्रकारे तक्रारी करण्याचं सातत्य ठेवलंय. एखाद्यानंही कधी येऊन चांगलं घर असल्याचं कौतुक केलं नाही. बाळासाहेब ठाकरे असताना मी प्लॉट घेतला होता. त्यांना तिकडे घर बांधणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी अभिनंदनही केलं. ते असते तर पहिल्या प्रवेशाला १०० टक्के आले असते. परंतु काही सुडबुद्धीचे लोकं सत्तेवर आहेत हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे," असंही ते म्हणाले. 

२ वर्षे काढली ही बाळासाहेबांची पुण्याई
गुणवत्ता नसतानाही सव्वादोन वर्ष काढली ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. ते असे नव्हते. आमच्याकडे पाहिल्यावर त्यांना आनंद वाटत होता, असंही ते म्हणाले.

Web Title: bjp leader minister narayan rane speaks about notice on his house mumbai criticize shiv sena bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.