'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:55 PM2022-02-23T17:55:48+5:302022-02-23T17:57:19+5:30

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP leader Narayan Rane has reacted after the arrest of Minister Nawab Malik by the ED. No. | 'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

Next

मुंबई- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून  ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून त्या ठिकाणी  मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लडेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असं नवाब मलिक यांनी म्हटलं. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या  कार्यालयात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आलेल्या अटकेवर यामध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नवाब मलिक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक हे काय बोलत होते, आता त्यांची बोलती बंद झाली असेल. आम्ही हे अनेक दिवस बोलत होतो आणि हे होणारच होतं. तसेच नवाब मलिक यांच्यानंतर नंबर कोणाचा नंबर आहे ,असे विचारले असता तुम्हाला लवकरच अटक झाल्यानंतर कळेल, असं नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.

काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.  

Web Title: BJP leader Narayan Rane has reacted after the arrest of Minister Nawab Malik by the ED. No.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.