मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेले आहेत. सध्या नारायणे राणेंची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. उद्या जन आशीर्वाद सिंधुदुर्गात असेल. त्यापूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले.
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानामुळे वादळ उठलं. राणेंना अटक झाली. त्याच रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला. पोलीस अटक करण्यासाठी आलेले असतानाही नारायण राणेंचा रक्तदाब वाढला होता. याशिवाय राणेंना मधुमेहाचाही त्रास आहे. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. यानंतर आता राणे लिलावतीत दाखल झाले आहेत. BJP leader Narayan Rane in Lilavati Hospital for routine check up after conflict with Shiv Sena
उद्या जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातराणेंची जनआशीर्वाद यात्रा उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाईल. सिंधुदुर्ग राणेंचा बालेकिल्ला मानला जात आहे. राणेंच्या स्वागतासाठी कणकवली शहर सज्ज झालं आहे. परवा झालेल्या राणे-सेना राड्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.