Join us

"आधी आमदार मुख्यमंत्री झाला की अभिनंदन करायचे अन् आता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:51 PM

उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून चांगलेच राजकारण तापलं आहे.  उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेवरील नियुक्तीवरून सध्या जे राजकारण सुरू आहे, त्याविषयी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

निलेश राणे म्हणाले की, ह्या अगोदर आमदार मुख्यमंत्री झाला की अभिनंदन करायचे आता मुख्यमंत्री आमदार झाला तर अभिनंदन करा असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तत्पूर्वी, राज्यात राजकीय पेच निर्माण होऊ नये म्हणून आपल्या नावाची शिफारस राज्यपालांकडे मंत्रिमंडळाने केली. मात्र त्यावरून ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते राज्यातील प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची आहे, मात्र दुर्दैवाने जी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे त्यावरून आपल्याला चिंता वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना सांगितल्याचे समजते.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली आहे. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्यानं या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद आमदारकीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना फोन करुन याबाबत नाराजी दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

भाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

कोरोनानंतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला

...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं

भाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यानिलेश राणे उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारशिवसेना