Join us

मुंबई सांभाळता येत नाही अन् वार्ता देशाच्या; संजय राऊतांना निवडणूक लढवून दाखवायचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:37 AM

संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत एक आव्हान दिले आहे.

मुंबई: दिल्लीतील उन्हाळा कडक आहे, पण दिल्लीचे सुस्तावलेपण त्यापेक्षा गंभीर आहे. एक प्रकारचा आळस दिल्लीच्या नसानसांत भरलेला दिसत आहे. आज देशात 14 कोटी लोक बेरोजगार झाल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले, पण देश चालवणाऱ्या दिल्लीलाही काम नाही असे चित्र आहे. राजकीय आंदोलने नाहीत म्हणून कार्यकर्ते आळशी झाले. विरोधक थंड पडले म्हणून राज्यकर्ते लोळागोळा झाले. दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती, असं विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. मात्र संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत एक आव्हान दिले आहे.

ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

संजय राऊत यांच्या विधानावर निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, तुम्ही एक तरी निवडणूक लढवून दाखवा. एक मुंबई शगर सांभाळता येत नाही आणि देशाच्या वार्ता करतायं, असं निलेश राणे यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी रोखठोक भूमिकेत म्हटलं की, मुंबईप्रमाणे कोरोनाचे भय दिल्लीत आहे. पण घरात किती काळ बसून राहायचे म्हणून कामधंद्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. दिल्लीतील अनेक केंद्रीय मंत्री व मोठे अधिकारी कोरोनाचे रुग्ण आहेत. अमित शहा यांच्यासह केंद्रातले सहा मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले. हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला होता. 

राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. रशियाने बनवलेली ‘लस’ बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत असा चिमटा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढला होता.

टॅग्स :संजय राऊतनिलेश राणे भाजपाशिवसेनामहाराष्ट्रनिवडणूक