Join us

राष्ट्रवादीच्या भित्रेपणावर 'प्रहार' करताना निलेश राणेंची चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:18 PM

निलेश राणे आणि रोहित पवार यांच्या वादात राष्ट्रवादीच्या युवा नेत्यानं देखील उडी घेतली होती.

मुंबई:  साखर उद्योगावरील आर्थिक संकटाला वाचा फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवॉर सुरु आहे. त्यातच आज पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, आमचा शिवसेनेशी अनेक वर्षाचा संघर्ष आहे. तसेच आम्ही एकमेकांना अनेकवेळा अपशब्द देखी वापरला. पण आम्ही दोघांनी लढाई मैदानाची ठेवली कधी तिसऱ्याला आमच्या लढाईत खेचले नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका कपटी आणि भित्रा निघाला की त्याने लगेच पळ काढला, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच स्वत: लढू शकत नसेल तर मैदानातही यायचंच नाही, असा टोला देखील निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

तत्पूर्वी, निलेश राणे आणि रोहित पवार यांच्या वादात राष्ट्रवादीच्या युवा नेत्यानं देखील उडी घेतली होती. यावर निलेश राणे यांनी त्यांना थेट धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ट्विट करत आपले विचार,आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो असा टोला निलेश राणेंना लगावला होता.

...म्हणून रशियातल्या 'त्या' नर्सनं पीपीईखाली फक्त अंतर्वस्त्रं घातली; कारण वाचून व्हाल अवाक्

काय आहे नेमकं प्रकरण?

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??', अशा आशयाचं ट्विट निलेश राणेंनी केलं होतं. यावर रोहित पवारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

''मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी'', असे ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. यावर निलेश राणे यांनी पुन्हा रोहित पवारांवर पलटवार केला होता.

मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली, असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाहीतर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी अशी टीका निलेश राणे यांनील केली होती. 

टॅग्स :निलेश राणे रोहित पवारशिवसेनाभाजपामहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस