"एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती ना; कुठे काही उडलेलं तर दिसलं नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 12:44 PM2020-07-12T12:44:16+5:302020-07-12T12:50:57+5:30
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे.
मुंबई: राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत (Sharad Pawar Interview with Sanjay Raut) घेतली आहे. ही मुलाखत गेल्या दोन दिवसांपासून वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारपासून ते चीन विरुद्ध सुरु असलेल्या घडामोडींवर देखील भाष्य केलं आहे. मात्र शरद पवार आणि संजय राऊतांची सुरु असलेल्या मुलाखतीवर भाजपाने टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी मुलाखतीआधी ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. यावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती ती मुलाखत झाली का, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुलाखतीनंतर कुठे काही उडलेल दिसलं नाही. हवा आली गेली तुझं माझं काय घेऊन गेली, असं म्हणत निलेश राणे यांनी मुलाखतीवरुन टोला देखील लगावला आहे.
एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती झाली का मुलाखत ती???? कुठे काही उडलेल दिसलं नाही. हवा आली गेली तुझं माझं काय घेऊन गेली.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 12, 2020
तत्पूर्वी, मुलाखतीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना 'या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: पहिले दोन महिने बाळासाहेब ठाकरेंची आठवण आल्याचं म्हटलं आहे. "बाळासाहेबांची कामाची पद्धत तुम्हाला माहीत आहे. बाळासाहेबांनी देखील काही दिवस घरात घालवले मात्र ते घालवत असताना सहकाऱ्यांना बरोबर ठेवून त्यांना प्रोत्साहित करून परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलेलं होतं" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
देशावर एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे सीमेवर चीनचं संकट यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केले आहे. माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ज्यावेळी देशात अनेक वर्ष आपला मित्र कोण, शत्रू कोण याचा विचार करतो त्यावेळी भारतीय मनात शत्रू म्हणून पहिल्यांदा पाकिस्तान येतं. पण देशाला पाकिस्तानपासून खरी चिंता नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-
CoronaVirus News : पुनश्च 'होम'! 'या' प्रश्नांची उत्तरे मिळणार का?
भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह
...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला
CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार