"संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 01:51 PM2021-05-27T13:51:37+5:302021-05-27T13:52:10+5:30

संभाजीराजेंच्या या भेटीनंतर भाजपाचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे.

BJP leader Nilesh Rane has told MP Sambhaji Raje that the Maratha community has not given you to use the issue of reservation. | "संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर..."

"संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर..."

googlenewsNext

मुंबई: खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं शरद पवारांना सांगितल्याचं संभाजीराजे भेटीनंतर म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करुन संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार अशी माहितीही संभाजीराजे यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 13 मिनिटं चर्चा झाली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, एकंदरीत मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला, असं संभाजीराजे यांनी सांगितले. 

संभाजीराजेंच्या या भेटीनंतर भाजपाचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की,  संभाजीराजेंच्या मनात काय भलंतच दिसत आहे. पवार साहेब व महाविकास आघाडी सरकारच्याजवळ जायचं असेल, तर खुशाल जावं, पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असं निलेश राणे यांनी यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेऊन सर्व परिस्थिती मांडली.

Web Title: BJP leader Nilesh Rane has told MP Sambhaji Raje that the Maratha community has not given you to use the issue of reservation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.