Join us

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:10 PM

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या शरद पवारांबद्दलच्या वादग्रस्त विधानावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

निलेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकवेळा घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. पण भाजपाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोणी अंगावर जाणार असेल तर जशास तसे उत्तर देऊ हे लक्षात ठेवा, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. 

तत्पूर्वी,  भाजपा गोपीचंद पडकरांच्या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांशी वैचारिक मतभेद असले तरी या भाषेत टीका करणं चुकीचं आहे. तसेच पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असं भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवरील वादग्रस्त विधानावर गोपीचंद पडळकरांची शाळा घेतली आहे. गोपीनाथ पडकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाचं अधिकृत विधान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा शरद पवार असो, अशा पद्धतीने टीका करणं चुकीचं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान

गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं-  

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

पडळकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर फडणवीसांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....

मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी

CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश

टॅग्स :गोपीचंद पडळकरनिलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशरद पवारनरेंद्र मोदीकाँग्रेस