निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार; काही महिन्यांपूर्वी रंगलं होतं ट्विटरवॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:24 PM2020-08-17T15:24:24+5:302020-08-17T15:57:15+5:30
काही महिन्यांपूर्वी निलेश राणे आणि रोहित पवारांचं ट्विटरवर युद्द रंगलं होतं.
मुंबई: भाजपाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.
निलेश राणेंना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. निलेश राणेजी लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत, असं रोहित पवार यांनी निलेश राणे यांना सांगितले. यानंतर निलेश राणे यांनी देखील मी आपला आभारी असल्याचे ट्विटद्वारे सांगितले.
मी आपला आभारी आहे 🙏🏻 https://t.co/JjJ2XUHX31
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 17, 2020
तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी निलेश राणे आणि रोहित पवारांचं ट्विटरवर युद्द रंगलं होतं. साखर उद्योगावरील आर्थिक संकटाला वाचा फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. ''साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??', अशा आशयाचं ट्विट निलेश राणेंनी केलं होतं.
निलेश राणेंच्या या टीकेवर रोहित पवारांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. ''मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी'', असे ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. यानंतर पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करुन रोहित पवारांना इशारा दिला होता.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली, असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाहीतर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी अशी टीका देखील निलेश राणे यांनी रोहित पवारांवर केली होती.
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020