मुंबई- काही दिवसापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी विदर्भातील एक प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये गेल्याचा आरोप केला आहे, यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
'आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना मी आव्हान करतो, त्यांच्याकडे एकही पुरावा असेलतर त्यांनी पुरावा द्यावा, असा आरोप आबज नेते नितेश राणे यांनी केला आहे.
'काही दिवसापूर्वी दाओस येथे झालेल्या संमेलनात चंद्रपुरात कोल गॅसप्रकल्प एमयुव्ही झाला आहे याची त्यांनी नोंद घ्यावी, असंही भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.
वरळीत आदित्य ठाकरेंचाच विश्वासू फोडणार?; शिंदे गटाने २ नेत्यांची थेट नावं घेतली
कितीही सभा घेतल्या तरी वरळीत मीच जिंकणार:आदित्य ठाकरे
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी चॅलेंज दिल्यानंतर हा वादा टोकाचा झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेतली. ३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, या शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर, आदित्य ठाकरेंनीही आज नाशिक जिल्ह्यातून शिंदे गटावर पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरे पक्ष बांधणीसाठी सध्या शिवसंवाद मेळावा घेत असून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यासाठी, आज निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शेतकरी व युवा संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी चक्क बैलगाडीत बसून आदित्य ठाकरे दाखल झाले. आकर्षक पद्धतीने बैलगाडी सजून यावर विराजमान होत आदित्य ठाकरेंची येथे एंट्री पाहायला मिळाली. यावेळी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. याच मेळाव्यात आदित्य यांनी शिंदे गटावर पलटवार केला. तसेच, पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिलं आहे. माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सभा घेत असून कितीही सभा घेतल्या, तरी माझ्या मतदारसंघात मीच जिंकणार, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटले.