मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाने ठाकरे पिता- पुत्रांना टोला लगावला आहे.
तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरवर ''डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूँ'' असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की त्यांना घाबरून राहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी या बैठिकित मांडले.
मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे; सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची डरकाळी
सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम सुरु केले आहे. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसशासित 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यात काँग्रेसचे 4 तर इतर पक्षांचे 3 मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय
'आता मंत्री आला की दूधानेच आंघोळ घाला'; राजू शेट्टी यांचा थेट 'बारामती'तचं इशारा