"ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 09:58 AM2020-08-10T09:58:18+5:302020-08-10T09:58:28+5:30

गुलाबराव यांच्या टीकेला भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

BJP leader Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Gulabrao Patil | "ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू"

"ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू"

googlenewsNext

मुंबई: नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली होती. नाणारला ८० टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी केल्याचं सांगतिलं जात आहे. त्यावर नारायण राणेंनी टीका केली होती. नारायण राणे या विधानानंतर आता मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी निशााणा साधला होता. मात्र आता गुलाबराव यांच्या टीकेला भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. या टीकेनंतर नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
नितेश राणे म्हणाले की, ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा, असं नितेश राणे यांनी सांगितले. तसेच टीका करायला ते दिवसातून किती तास शुद्धीत असतात. हे शुद्धीत कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, अशी खोचक टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण-

दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. तसेच नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना नारायण राणे यांनी जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं होतं. नारायण राणेंच्या या विधानानंतर शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले होते.

नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. तसेच नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले? राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं, सेनेत असताना मुख्यमंत्रीपदही दिलं. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये,' असा टोला गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना लगावला होता.

Web Title: BJP leader Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.