Join us

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 9:24 PM

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे एक सवाल उपस्थित केला आहे.

मुंबई: मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत हे माहीत आहे. पण माझा त्यांचा परिचय नाही. आदित्य ठाकरे यांना व्यक्तिश: ओळखत नाही, त्यांना कधीच भेटले नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तींने केला होता. मात्र याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे एक सवाल उपस्थित केला आहे.

राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय, असा दावा त्यांनी केला आहे.

 सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सीबीआय सोबतच ईडी देखील  सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहे रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं नावदेखील घेतलं जात होतं. मात्र आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही, असं रियानं निवेदनात म्हटलं होतं. तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं होतं. यामध्ये 'आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही,' असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात होतं.

तत्तपूर्वी, राज्य सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे, बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

रियाच्या भावासोबत इतरही लोकांवर केस-

एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. रिया विरोधात क्रिमिनल केस दाखल झाली आहे. ज्या लोकांची नावे ईडीच्या एफआयआरमध्ये होते त्यांच्या विरोधात एनसीबीने केस दाखल केली आहे. त्यात रियाच्या भावाचाही समावेश आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर 'असे' होतात अंत्यसंस्कार; पाहा मुंबईच्या स्मशानभूमीतील मन हेलवणारे फोटो

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय

'आता मंत्री आला की दूधानेच आंघोळ घाला'; राजू शेट्टी यांचा थेट 'बारामती'तचं इशारा

टॅग्स :आदित्य ठाकरेनीतेश राणे सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीपोलिसशिवसेनाभाजपाइन्स्टाग्राम