भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 07:33 PM2020-07-03T19:33:47+5:302020-07-03T19:33:54+5:30

भाजपाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट प्रतिक्रिया दिली आहे.

BJP leader Pankaja Munde has congratulated the members of the new BJP executive | भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाल्या...

भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Next

मुंबई: भाजपाने आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र भाजपाच्या कार्यकारिणीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आलं आहे. पंकडा मुंडे यांना भाजपा कार्यकारिणीत महत्वाची भूमिका देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान न दिल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. परंतु पंकजा मुंडे यांना केंद्राच्या कार्यकारिणीत जबाबदारी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

भाजपाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाले की, नवीन भाजपाच्या टीमचे अभिनंदन. तसेच माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार.

तत्पूर्वी, पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल. तसेच भाजपाच्या नेत्या प्रीतम मुंडे आणि भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे आणि भाजापाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे जबाबदारी दिली, असं नाही, अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजपाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील असणार आहे. महामंत्री म्हणून सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक यांनी वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्ष पदी राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच कोषाध्यक्ष म्हणून मिहीर कोटेचा, प्रतोद माधुरी मिसाळ उमा ताई खापरे यांनी निवड करण्यात आली आहे.

Web Title: BJP leader Pankaja Munde has congratulated the members of the new BJP executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.