Join us

ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव; प्रवीण दरेकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:04 PM

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली.

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन ४८ उमेदवारांची घोषणा केली, यामुळे आता महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे दिसत आहे. सांगली, भिवंडी जागेवरही उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली.  

अब की बार, 'वेगळाच' उमेदवार! ४४ वर्षांनंतर सांगलीत 'वसंतदादा' घराण्यातील शिलेदाराविना निवडणूक

"काँग्रेस पक्षाचा एकत्रित कार्यक्रमच करायची भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्रित आहे की काय अशा प्रकारचं चित्र दिसतंय. कारण भिवंडीतील जागा जिथे खरा काँग्रेसचा जनाधार आहे ती जागा राष्ट्रवादीने घेतली. त्याचबरोबर सांगलीची जागा तिथे काँग्रेसचा जनाधार आहे ती जागा ठाकरे गटाने घेतली. काँग्रेसची शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत फरपट झाल्याचे दिसत आहे, असा टोलाही भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. 

सांगली, भिवंडीबाबत मोठा निर्णय: मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

नंदुरबार, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई, मुंबई उत्तर पूर्व अशा एकूण १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढणार असून यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, माढा, अहमदनगर दक्षिण, रावेर, भिवंडी,  बीड, वर्धा, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे २१ जागा लढणार असून यामध्ये जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या मतदारसंघांचा समावेश आहे. 

टॅग्स :प्रवीण दरेकरभाजपाकाँग्रेस