राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली, यावर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले
'उदयनराजे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत, अशा प्रकारचे वक्तव्य आल्यानंतर त्यांचा उद्वेग समजण्यासारखा आहे. यातून आलेली त्यांची भूमिका आहे. राज्यपाल यांच्यावरुन राजकारण करण्याचे काम विरोधकांचे सुरू आहे, राज्यपाल यांची जी काय इच्छा असेल आणि ती काय प्रक्रिया असेल ती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणाकडे लक्ष आहे, ते योग्य वेळीच निर्णय घेतील, असंही दरेकर म्हणाले. संजय राऊत यांचा आवाज क्षीण झाला आहे, ते आता जे बोलताता त्याला आधार नाही, असा टोलाही दरेकर यांनी राऊत यांना लगावला. 'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली.
गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन राज्यभरात शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला. तसेच माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही निषेध केला होता, आज भाजप खासदार उदयनराजे भासले यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.
"आज राज्यातील शिवप्रेमींशी चर्चा केली, सर्वांनी मुद्दे मांडले. महाराजांचे चित्रपटातून अवहेलना केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही? तुम्ही महाराजांचे राजकारणासाठी नाव का घेता, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. लोकशाहीचा ढाचा महाराजांनी मांडला. जे महाराजांवर चुकीच बोलतात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का होत नाही, असंही खासदार भोसले म्हणाले.
"महाराजांनी सर्वांना एकत्र आणले होते, सगळ्या जातींना एकत्र राहण्यास शिकवले होते. महाराजांबद्दल सध्या होत असलेल्या राजकारणामुळे लोक चिडले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगडावर जाऊन प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार" असल्याचे खासदार उदयनराजे भासले म्हणाले.