Join us

"एवढी वर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:03 PM

बाळासाहेब थोरात यांच्या या विधानावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे.

मुंबई:  विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. 

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सरकारच्या कामकाजाबाबत आमची कसलीही नाराजी नसून महाविकास आघाडी भक्कम आहे. हे सरकार पाच वर्ष चांगले काम करेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे.

India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आणि मंत्र्यांना कोणीही विचारत नाही. परंतु तरीदेखील काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. त्यामुळे मी एवढी वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्याचप्रमाणे एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी अपेक्षा यांच्याकडून करता येणार नाही असं मत देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेवर बाळासाहेब थोरात यांनी देखील पलटवार केला आहे.  काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले. हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम

तत्पूर्वी, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, नाराजीचा विषय नव्हता. काही विषय समोरासमोर बसून चर्चा करण्याचे असतात. मोठ्या बैठकांमध्ये अशी चर्चा होऊ शकत नाही. आज झालेली चर्चा सकारात्मक होती, काही विषय प्रशासकीय होते. कोरोनाच्या संकट काळात गरीब माणूस अडचणीत आला आहे, त्याला कशी मदत करता येईल याबाबत बैठकीत व्यवस्थित चर्चा झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्याय योजना देशासाठी मांडली आहे. त्याच्या अंमलबजावणीवरही बैठकीत चर्चा झाली. कोकणात फळबागांचे झालेले नुकसान, यावरही चर्चा झाली. विकास निधीचे वाटप समान व्हायला हवे, म्हणजे कोणा मध्येच नाराजी राहत नाही त्या अनुषंगाने ही चर्चा झाली. विधान परिषदेच्या जागांचे समान वाटप व्हावे, हेही ठरलेले आहे. बैठकीत कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विषयी चर्चा झालेली नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :बाळासाहेब थोरातराधाकृष्ण विखे पाटीलकाँग्रेसभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार