'...तर मुंबईत निर्भयासारखी हजारो प्रकरणे घडतील'; भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:19 PM2020-01-21T12:19:34+5:302020-01-21T12:28:38+5:30

मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

BJP leader Raj Purohit has said that if nightlife starts, there will be thousands of varieties like Nirbhaya in Mumbai. | '...तर मुंबईत निर्भयासारखी हजारो प्रकरणे घडतील'; भाजपा नेत्याचा दावा

'...तर मुंबईत निर्भयासारखी हजारो प्रकरणे घडतील'; भाजपा नेत्याचा दावा

Next

मुंबई: आगामी 26 जानेवारीपासून मुंबईत नाइटलाइफ सुरु करण्याची घोषणा पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. नाइटलाइफच्या संदर्भात मंत्रालयात देखील एक नुकतीच बैठक पार पडली असून बैठकीत प्रायोगिक तत्वावर नाइटलाइफ सुरु करण्याची संमती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर भाजपाकडून विरोध करण्यात येत आहे. त्यातच मुंबईत नाइटलाइफ सुरु केल्यास हजारो निर्भयासारखे प्रकरणे घडतील असा दावा भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी केला आहे.

हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेवा; 'नाइटलाइफ'वरून राणेंचा सेनेला टोला

राज पुरोहित म्हणाले की, मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. मात्र मुंबईत मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच नाइटलाइफमुळे हजारो निर्भयासारख्या घटना घडतील असा दावा राज पुरोहित यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी ही संस्कृती योग्य आहे का याचा विचार करावा असं देखील राज पुरोहित यांनी सांगितले.

मुंबईमध्ये नाइटलाइफसाठी आग्रही असलेले आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Read in English

Web Title: BJP leader Raj Purohit has said that if nightlife starts, there will be thousands of varieties like Nirbhaya in Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.