Sanjay Raut: राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा, संजय काकडेंचा राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 06:19 PM2021-05-09T18:19:35+5:302021-05-09T18:22:21+5:30
Sanjay Raut: पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' लेख लिहिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
Sanjay Raut: पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' लेख लिहिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी अर्धवट आणि राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणं थांबवावं, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी लगावला आहे.
काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, तो तर आघाडीचा आत्मा: संजय राऊत
"संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण लिखाणाची अपेक्षा आहे. त्यांनी आज 'मोदी-शहा का हरले' हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचं दर्शन घडवलं आहे", असं संजय काकडे म्हणाले.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना भाजपवर आणि मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. "खोटा प्रचार व बदनामी ही निवडणुकीतील शस्त्रं आता जुनाट व बोथट झाली आहेत. याच न्यायानं उद्या मोदी व शहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल तर त्यांना स्वतःला बदलावे लागेल," असा इशारा राऊत यांनी दिला.
शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच इतर राज्यात चिता पेटलेल्या दिसतायत: संजय राऊत
राऊतांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना संजय काकडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "डोळ्यावर पट्टी बांधून लिखाण केल्यामुळे संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळवलेले यश दिसले नाही", असा टोला संजय काकडे यांनी लगावला आहे.