मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते.
गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उमटत आहे. त्यातच आता गोपीचंद पडळकरांनी केलेल्या शरद पवरांवरील विधानावर भाजपाचे नेते वैभव पिचड यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे.
वैभव पिचड म्हणाले की, गेली ५० वर्षे शरद पवारांनी अविरतपणे जनतेची कामं केली आहे. आपण घरातसुद्धा ज्येष्ठ माणसाचा कुठलाही अनादर करत नाही. चुकीला चूक म्हणणं हे संस्कार आपल्याला दिले आहेत. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवरांवर केलेलं वक्तव्य हे पूर्णपणे चूकीचंच आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकरांना घरचा आहेर देत वैभव पिचड शरद पवारांसाठी मैदानात उतरले आहे.
तत्पूर्वी, वैभव पिचड यांचे पिता आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही गोपीचंद पडळकरांच्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मी भाजपात असलो तरी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलं आहे. टीका करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या वयाचे भान ठेवावे, असं मधुकर पिचड यांनी सांगितले. त्यामुळे या पिता पुत्राने पक्ष जरी बदलला असला, तरी पवारांशी जुळलेली नाळ यावरुन दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं होतं-
शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.
अन्य महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासाएवढेही नाहीत; गोटेंची जळजळीत टीका
शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला
"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा
"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला