'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 20:04 IST2020-02-15T20:00:36+5:302020-02-15T20:04:02+5:30
मनसेने झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागली होती.

'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'
मुंबई: मनसेने झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागली होती. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे विचार भाजपाशी साम्य असेल तर भविष्यात मनसे आणि भाजपाची युती होण्यास काही अडचणी नसतील असं मत व्यक्त केले होते. मात्र आता मनसेसोबत कोणत्याच प्रकारची हातमिळवणी करणार नसल्याची भूमिका भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केली आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यावर येऊन ठेपली असताना या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे एकट्या पडलेल्या भाजपाला नवी मुंबईत मनसेची साथ मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपा मनसेसोबत कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करणा नाही. नवी मुंबई महापालिकेची निवडणुक भाजपा स्वबळावर लढणार असून आमची एकहाती सत्ता येईल असा विश्वास विनोद तावडे यांनी नवी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश बैठक , नवी मुंबई येथे सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शुभारंभ #MahaBJPAdhiveshanpic.twitter.com/ymDnOmrtSG
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 15, 2020
@BJP4Maharashtra ची नवी मुंबईत बैठक सुरु आहे. दुपारी आमदार, खासदार, माजी खासदार व आमदारांसह प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis, @v_shrivsatish जी,विजयराव पुराणिक, केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar, @raosahebdanve व इतर मान्यवर उपस्थित आहेत. pic.twitter.com/furSZtAw4U
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 15, 2020
नवी मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं. यातच अनेक नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत गणेश नाईकांच्या गोटात सामील झाले त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे.