भाजपाकडून देण्यात आलेली राणेंची खासदारकी काढून घ्या, सिंधुदुर्गातील 'या' नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 11:38 AM2018-12-19T11:38:58+5:302018-12-19T11:54:08+5:30

भाजपाचे सिंधुदुर्गातील नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्यावी, अशी मागणी केली आहे.

BJP leaders demanded to expel narayan Rane's as a MP | भाजपाकडून देण्यात आलेली राणेंची खासदारकी काढून घ्या, सिंधुदुर्गातील 'या' नेत्याची मागणी

भाजपाकडून देण्यात आलेली राणेंची खासदारकी काढून घ्या, सिंधुदुर्गातील 'या' नेत्याची मागणी

Next
ठळक मुद्देमाजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्यावी, अशी मागणी केली प्रमोद जठार यांनी भाजपाच्या प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे पत्राद्वारे राणेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सध्या भाजपाच्या कोट्यातून नारायण राणे राज्यसभेवर खासदार आहेत.

मुंबई- भाजपाचे सिंधुदुर्गातील नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्यावी, अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी भाजपाच्या प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे पत्राद्वारे राणेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

नारायण राणेंनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. तसेच त्यांनी स्वतःचा पक्ष एनडीएमध्ये सामील केला. त्यानंतर भाजपानं आपल्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवलं. सध्या भाजपाच्या कोट्यातून नारायण राणे राज्यसभेवर खासदार आहेत. स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेदरम्यान नारायण राणे जाणूनबुजून भाजपाला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजपा नेत्यांमध्येच राणेंबद्दल असंतोष वाढत चालला आहे.

तसेच सिंधुदुर्गात भाजपाला राणे खिळखिळी करत असल्याचाही एक मतप्रवाह आहे. भाजपामधूनच राणेविरोधी वातावरण निर्मिती झाल्यामुळे त्यांची खासदारकीवरून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिंधुदुर्गच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: BJP leaders demanded to expel narayan Rane's as a MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.