मुंबई - आरे कारशेड प्रकल्पाला नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थिगती दिल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे, विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हटले आहे. स्वत:च्या अहंकारासाठी विकासकामाला अडथळा आणू नका. मुंबईकरांच्या विकासाचं काम बंद करु नका, असं आवाहनही शेलार यांनी केलंय. त्यानंतर, ट्विट करुन शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीवरही त्यांनी टीका केली.
आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. मेट्रोच्या कारशेडचं काम सुरु राहिला. मात्र, आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी, आरेतील कारशेडच्या स्थगितीचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यावर, आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी या निर्णयाचं स्वागत केलं असून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचं आदित्य यांनी म्हटलं असलं तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच असल्याचे ट्विट करत नव्या सरकारच्या या निर्णयावर फडणवीसांनी टीका केली आहे.
तर, आशिष शेलार यांनीही आरेच्या प्रश्नावरुन कारे केलंय. तसेच, विनाशकाले विपरीत बुद्धी असंही ते म्हणाले. “धनुष्यबाणा”च्या “हातात” “घड्याळ” बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार! 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.