शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले, विधान परिषदेतही गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:08 AM2018-02-28T08:08:50+5:302018-02-28T08:08:50+5:30

शेतक-यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचा प्रादुर्भाव, गारपीटग्रस्तांनाही सरकार दिलासा देत नाही. सरकार शेतक-यांना तुघलकी वागणूक देत असल्यामुळे धर्मा पाटीलसारख्या शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत, असा आरोप करत मंगळवारी विरोधकांनी शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

The BJP Leaders surrounded by opposition leaders on the issues of farmers | शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले, विधान परिषदेतही गदारोळ

शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले, विधान परिषदेतही गदारोळ

Next

विशेष प्रतिनिधी / मुंबई : शेतक-यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचा प्रादुर्भाव, गारपीटग्रस्तांनाही सरकार दिलासा देत नाही. सरकार शेतक-यांना तुघलकी वागणूक देत असल्यामुळे धर्मा पाटीलसारख्या शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत, असा आरोप करत मंगळवारी विरोधकांनी शेतक-यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सुरुवातीला वीस मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.

कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीचा प्रादुर्भाव, गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. गळ्यात पाट्या लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का, असा सवाल त्यांनी या वेळी केला. १७ जिल्ह्यात दौरा केला, पण कर्जमाफी झालेला एकही शेतकरी भेटला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकºयांना मदत करणे तर दूरच त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरू आहेत, असा आरोप मुंडे यांनी केला. गारपिटीत शेतक-यांनी पशुधन गमावले. तेव्हा कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा, असे आदेश अधिका-यांनी दिले. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते, असा सवालही मुंडे यांनी केला.

यादरम्यान विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोर जमा होत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. या गदारोळातच सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, वाढत्या गोंधळामुळे सभागृह तहकूब करण्यात आले. 

Web Title: The BJP Leaders surrounded by opposition leaders on the issues of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.