मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 07:30 AM2021-01-19T07:30:32+5:302021-01-19T07:31:39+5:30

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

BJP Mahila Morcha's statewide agitation for Munde's resignation | मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर आंदोलन

BJP Mahila Morcha's statewide agitation for Munde's resignation

Next


मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. उमा खापरे म्हणाल्या की, सामाजिक न्यायसारखे खाते सांभाळणारे धनंजय मुंडे हे स्वत:हून नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. महिलांचा आदर ठेवून सन्मानाविषयी बोलणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंडेंचा राजीनामा घेतील अशीसुद्धा अपेक्षा होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
विदर्भामध्ये नागपूर, अमरावती शहर- ग्रामीण, बुलढाणा, उत्तर महाराष्ट्रमध्ये नाशिक व जळगाव, पालघर जिल्ह्यातील वाडा, ठाणे, रायगड, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सातारा, लोणावळा मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, तसेच राज्यभरातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे आंदोलन झाले. 

‘मुख्यमत्र्यांनी लक्ष द्यावे’
- सामाजिक न्यायसारखे खाते सांभाळणारे धनंजय मुंडे हे स्वत:हून नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. 
- तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

Web Title: BJP Mahila Morcha's statewide agitation for Munde's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.