मुंबई - भाजपा आमदार अमित साटम (BJP MLA Ameet Satam) य़ांनी शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही" असं म्हणत इशारा दिला आहे. तसेच "गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबई महानगर पालिकेमध्ये 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ही लढाई असत्याच्या विरुद्ध सत्याची आहे. अधर्माच्या विरुद्ध धर्माची आहे. अन्यायाच्या विरुद्ध न्यायाची आहे. ही लढाई आहे मुंबईकर विरुद्ध आदित्यसेना" असं देखील साटम यांनी म्हटलं आहे,
अमित साटम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनता मुंबई महानगपालिकेच्या या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना उखडून फेकल्या शिवाय राहणार नाही" अशा शब्दांत निशाणा साधला आहे. "मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जवळपास 180 प्रस्ताव जवळपास 2000 कोटींचे आहेत हे मांडणार आहेत आणि मंजूर करून घेणार आहेत... जशी काय यांची सत्ता ही आता जाणारच आहे आणि उरलेल्या बैठकीत मुंबईकरांचे पैसे ओरबाडून घेता येईल तेवढं ओरबाडून घेणे हेच यांचे उद्देश्य राहिले आहे" असं ट्विट केलं आहे.
"ही लढाई आहे मुंबईकर विरुद्ध आदित्यसेना"
"गेल्या २ दिवसांपासून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट कंत्राटदारांवर आयटी विभागाच्या धाडी सुरू आहेत. जी आकडेवारी समोर येत आहे त्यातून हेच दिसते की गेल्या ५ वर्षात ५०००० कोटींपेक्षा जास्तचे प्रस्ताव समितीमध्ये पारित झाले आणि त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबई महानगर पालिकेमध्ये 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनता मुंबई महानगपालिकेच्या या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना उखडून फेकल्या शिवाय राहणार नाही. ही लढाई असत्याच्या विरुद्ध सत्याची आहे. अधर्माच्या विरुद्ध धर्माची आहे. अन्यायाच्या विरुद्ध न्यायाची आहे. ही लढाई आहे मुंबईकर विरुद्ध आदित्यसेना" असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे.