"बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:52 AM2020-08-28T11:52:41+5:302020-08-28T11:56:38+5:30

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राज्य सरकारला धक्का

bjp mla ashish shelar hits out at state government after sc verdict on final year exam | "बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा"

"बबड्याच्या हट्टापायी १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास; शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा"

Next

मुंबई: अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी युवासेनेच्या वतीनं आदित्य ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यानं युवासेनेला धक्का बसला आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.



'कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले?,' असा सवाल शेलारांनी ट्विट करून विचारला. 'एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला,' असा टोला त्यांनी लगावला आहे.



'आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार...! ऐकतो कोण? माननीय सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला! महाराष्ट्रातील "पाडून दाखवा सरकारने" स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले!,' अशा शब्दांत शेलार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. 'विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका. परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ या. यश तुमच्या वाट्याला नक्की येईल. तुमचे भविष्य उज्वलच आहे!!,' असंदेखील शेलारांनी म्हटलं आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
 

Web Title: bjp mla ashish shelar hits out at state government after sc verdict on final year exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.