सुशांतच्या आत्महत्येच्या तपासात राज्यातील युवा मंत्र्याचा दबाव; भाजपा आमदाराचं थेट दिल्लीला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:15 PM2020-07-31T13:15:08+5:302020-07-31T13:16:41+5:30
महिना उलटल्यानंतर सुशांतचे वडिल के के सिंग यांनी याप्रकरणी बिहार पोलिसांत गुन्हा नोंदवला.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा महिना उलटून गेल्यानंतरही रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपाच्या आमदारानं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून या आत्महत्येचा तपास CBIनं करावा अशी मागणी केली आहे. शिवाय त्यांनी राज्यातील युवा नेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटलं की,''अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना केली आहे.''
''राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पार्थ अजित पवार यांनीही अशीच मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य रितीनं करत नसल्याची शंका राज्यातील जनतेमध्ये निर्माण होत आहे. राज्य मंत्रीमंडळातील मुंबईत राहणाऱ्या युवा मंत्रीचा स्वार्थ या प्रकरणात दडला आहे, अशी चर्चा आहे. सुशांतच्या बहिणीनेही अशीच शंका उपस्थित केली आहे,''असेही भातखळकर म्हणाले.
पाहा व्हिडीओ..
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2020
CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांना केली आहे. pic.twitter.com/qkwthvTfeA
श्रीसंतच्या रुममध्ये राहायच्या मुली, लाखो रुपयांचं व्हायचं बिल; क्रिकेटपटूचा धक्कादायक गौप्यस्फोट!
Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी
दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाचा पराक्रम; इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!
आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!