'अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले'; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 02:48 PM2022-05-27T14:48:42+5:302022-05-27T14:51:48+5:30

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized CM Uddhav Thackeray. | 'अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले'; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

'अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले'; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

Next

मुंबई- शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा, आम्ही उद्या लगेच तुमचं नाव जाहीर करु, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. शिवसेनेबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. पण मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. तसेच घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी राज्यसभेची निवडणूक लढवणार, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच ही माझी माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचंही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं. 

संभाजीराजेंच्या या विधानावर आता भाजपानेही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले.आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. 

दरम्यान, राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे. राज्यभरात दौरे करून संघटनेला उभारी देणार आहे. मला माझी ताकद ४२ आमदार नाही तर जनता आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

१० जूनला राज्यसभेची निवडणूक-

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized CM Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.