Join us  

नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमदारकी का सोडली नाही?; नितेश राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:31 PM

तुमचे धर्मांतरण केले आहे. तुम्ही हिंदु राहिला नाही कसली हिंदुत्वाची भाषा करता? अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

मुंबई - उद्धव ठाकरेंनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हाची शेवटची फेसबुक लाईव्ह महाराष्ट्राने आठवावी, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो असं म्हटलं होते. मग नैतिकतेची भाषा करणारे खरेच तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव असाल तर आमदारकीचा राजीनामा का देत नाही? बाळासाहेबांच्या तोंडातून निघालेला शब्द बंदुकीची गोळी असायची. शब्द कधीही मागे फिरवला नाही. तुम्ही आमदारकी सोडू शकत नाही. नैतिकता असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. बाळासाहेबांचा गुण तुमच्यात आहे का? असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

नितेश राणे म्हणाले की, फार नैतिकतेची भाषा कालपासून चाललीय. शिवसेना अधिकृतपणे एकनाथ शिंदेंकडे आहे. सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असले तरी त्याला कोर्टाने स्थगिती दिली नाही. धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंकडे आहे. शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे वापरू शकत नाहीत. वेगळे नाव आणि वेगळे चिन्ह वापरावे लागेल. २०१४ ते २०१९ मध्ये काळात जेवढी तुमची काळजी सख्ख्या भावाने घेतली नाही तेवढी काळजी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची घेतली. कुटुंबियांप्रमाणे तुम्हाला सांभाळले, मातोश्री २ ला परवानगी कुणी दिली? बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला दिला, त्याच्या परवानगी कुणी दिली तर फडणवीसांनी दिली, उद्धव ठाकरे सर्वात बेईमान माणूस, हिंदुत्वाची, बाळासाहेबांची आणि शिवसैनिकांची बेईमानी केली असं त्यांनी म्हटलं. 

तसेच लालूप्रसाद यादव यांचा मुलगा मातोश्रीवर आला होता, ज्या लालूप्रसादांनी उभ्या आयुष्यात कितीतरी वेळा बाळासाहेबांचा अपमान केला, लालूप्रसादांचे हिंदुत्वाबद्दल काय विचार होते ते सांगा, तुमचे धर्मांतरण केले आहे. तुम्ही हिंदु राहिला नाही कसली हिंदुत्वाची भाषा करता? नितीश कुमार, तेजस्वी यादवांना बाळासाहेबांच्या खोलीत घेऊन जात नतमस्तक व्हायला सांगायचे होते. स्वत:चा आत्मा, धर्म विकून तुम्ही महाराष्ट्राची बदनामी केली असा आरोपही नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. 

जगातला सर्वात मोठा मुर्ख आणि XXX हा संजय राऊतनंगानाचाबद्दल कुणी बोलावे, विश्लेषण करावे तर संजय राऊतांनी?, मुंबईच्या आरेतील गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या नंगानाचाबद्दल राऊतांनी माहिती घ्यावी, तिथे कुठला नंगानाच होता? याबद्दल त्यांनी सांगावे, दुसऱ्यांचे कपडे काढण्याअगोदर तू कुठे कपडे काढतो याही बद्दल त्यांनी बोलावे, नाहीतर आम्ही दाखवतो. हे सरकार ३ महिने आहे पुन्हा जाणार आहे असं फेब्रुवारीतही बोलले, आता मे महिना आलाय, सरकार कुठे गेले उलट अजून भक्कम झाले, महाराष्ट्र हे सरकार ताकदीने पुढे घेऊन जाणार आहे. अब तेरा क्या होगा संजय राऊत? ३ महिन्यात सरकार जाते की संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जातात हे पाहू. जेलमध्ये पहाटे ४ वाजता बाथरूमसाठी भांडायचा. १ तास बसायचे. सर्व कैद्यांनी जेलरकडे राऊतांची तक्रार केली होती. संजय राऊतांचा पावसाळा जेलमध्ये जाईल असा दावाही नितेश राणेंनी केला. 

'त्या' तिघांचा जाहीर नागरी सत्कार करायचाय" उद्धव ठाकरेंनी २ अनिल यांचे आभार मानले, आम्हीपण अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत यांचे मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. या तिघांचे नागरी सत्कार करण्याची संधी आम्हाला द्यावी. हे तिघे नसते तर आज उद्धव ठाकरेंवर असा दिवस बघायला लागला नसता. अनिल देसाई कोर्टात का गेले नव्हते? अनिल परबचे नाव साई रिसोर्टच्या आरोपात का आले नाही? असा प्रश्नही नितेश राणेंनी ठाकरेंना विचारला. 

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेसंजय राऊत