...म्हणून मी आदित्य ठाकरे जात असताना म्याव, म्याव केलं; नितेश राणेंनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:09 PM2021-12-23T18:09:20+5:302021-12-23T18:09:43+5:30

सदर कृत्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

BJP MLA Nitesh Rane has criticized Shiv Sena | ...म्हणून मी आदित्य ठाकरे जात असताना म्याव, म्याव केलं; नितेश राणेंनी दिलं स्पष्टीकरण

...म्हणून मी आदित्य ठाकरे जात असताना म्याव, म्याव केलं; नितेश राणेंनी दिलं स्पष्टीकरण

Next

मुंबई- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कॉपी आणि माफीने गाजला. तसेच, राज्यात भरतीच्या परींक्षांमध्ये सुरू असलेला घोळ आणि भ्रष्टाचार यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहात आक्रमपणे आपली भूमिका मांडत होते. यावेळी, भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांनी पायऱ्यावर बसून केली. 

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव... असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

सदर कृत्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हो, मी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांना सोंगाड्या म्हटले आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. विधानसभा सभागृहात त्यांनी मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यानतंर, जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. याच नक्कल घटनेवरुन नितेश राणेंनी भास्कर जाधव यांना सोंगाड्या असे संबोधले. 

Web Title: BJP MLA Nitesh Rane has criticized Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.