मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:39 AM2020-04-30T11:39:37+5:302020-04-30T11:40:36+5:30

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

BJP MLA Nitesh Rane Target Shiv Sena over Uddhav Thackeray's MLA post pnm | मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला

मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला

Next

मुंबई – राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंना २८ मे पर्यंत आमदार होणे बंधनकारक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेवरुन त्यांची निवड करावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिफारस केली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेटसुद्धा घेतली आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना फोन केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. मोदी है तो मुमकिन है अशा आशयाचा सामना अग्रलेख होऊन जाऊद्या राऊत साहेब असं सांगत त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना आमदार बनवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी मंत्रिमंडळात ठराव करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिफारस पाठवली आहे. तरीही अद्याप राज्यपालाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदार नियुक्तीची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील हा राजकीय पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फोन करुन मदत मागितल्याची माहिती आहे.

दरम्यान, विधान परिषद नियुक्तीवरुन ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते राज्यातील प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची आहे, मात्र दुर्दैवाने जी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे त्यावरून आपल्याला चिंता वाटत असल्याचे ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचे समजते. त्याचसोबत या राजकीय पेचाप्रसंगी नरेंद्र मोदींनी मदत करावी, जर ते झालं नाही तर मला राजीनामा द्यावा लागेल असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले त्यानंतर मोदींनीही संबंधित प्रकरणात लक्ष घालून माहिती मागवतो असं आश्वासन उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्रांनी एएनआयला दिली आहे.

मात्र, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात कोरोना त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सातत्याने चर्चा होत आहे. चारवेळा दोघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सही झाली. तसेच गृहमंत्री अमित शहा हे देखील ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले आहेत. त्यामुळे त्याचा लगेच असा अर्थ काढणे योग्य होईल असे वाटत नाही. बोलणे झाले की नाही हे ते दोघेच सांगू शकतील असं संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

अन्य बातम्या

...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं

भाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

७ महिन्याच्या गरोदर महिलेने एकाचवेळी दिला ५ मुलांना जन्म; डॉक्टरही झाले हैराण!

“ज्या दिवशी भारतीय मुस्लीम अरब देशाकडे तक्रार करतील तेव्हा वादळाचा सामना करावा लागेल”

 

Web Title: BJP MLA Nitesh Rane Target Shiv Sena over Uddhav Thackeray's MLA post pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.