Join us  

"२०२० मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं..."; प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 1:47 PM

Prasad Lad On Anil Deshmukh : मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

Prasad Lad On Anil Deshmukh ( Marathi News ) : मुंबई- मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. 'देशमुख हे पीए मार्फेत पैसे घेत होते' असा गौप्यस्फोट सचिन वाझे यांनी केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत वाझे यांचे हे आरोप म्हणजे फडणवीस यांची नवीन चाल असल्याचे सांगत टीका केली. या टीकेला आता भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले.  

"संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण..."; मन हेलावून टाकणारी घटना

आमदार प्रसाद लाड म्हणाले, अनिल देशमुखजी तुमची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवते की खोट बोला पण रेटून बोला. आपलेच दात आणि आपलेच ओठ, ज्या पद्धतीने आज अनिल देशमुख यांनी सांगितले की गुन्हेगारेचे स्टेटमेंट ग्राह्य धरले जात नाही. पण, या गुन्हेगाराला नोकरीत घेतले काणी? २००३ च्या खून प्रकरणात वाझेंना काढलं. त्या वाझेला २०२४ नंतर नोकरीत घेण्यासाठी कोणी प्रयत्न केले. पाठपुरावा कोणी केला? ज्या उद्धव ठाकरेंनी नोकरीत घ्या म्हणून सांगितलं पण फडणवीस यांनी याला विरोध केला. त्याला तुम्ही नोकरीत घेतलं. त्यानंतर शंभर कोटींची वसुली असेल, जिलेटीनचे प्रकरण असेल, मनसुख हिरेन हत्या असेल अशा अनेक प्रकरणात ज्या वाझेचा हात होता त्या वाझेला आशीर्वाद कोणाचा होता?, असा सवालही आमदार प्रसाद लाड यांनी केला. 

"आता तुम्ही म्हणताय एका आरोपीचे स्टेटमेंट ग्राह्य धरली जात नाही, अहो देशमुख वाझेंना परत नोकरीस घेण्याच काम तुमच आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांचं होतं. आता तुम्हीच टीव्हीवर येऊन सांगता की आरोपीचे स्टेटमेंट ग्राह्य धरली जाऊ नये. ज्या वाझेंना मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश दिला ते संजय राऊतही असंच सांगत आहेत. यांनी स्वत:ची नैतिकता संपवली आहे. सरकारचा वापर मुंबईतून पैसे गोळा करण्यासाठी केला, असा आरोपही आमदार प्रसाद लाड यांनी केला.  

टॅग्स :प्रसाद लाडअनिल देशमुखसचिन वाझेदेवेंद्र फडणवीस