...तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही; आमदार प्रसाद लाड ठाकरे गटावर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:41 AM2023-07-10T05:41:06+5:302023-07-10T05:41:47+5:30
कालपरवापर्यंत घरी बसलेले आणि झोपी गेलेले जागे झाले आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत तुमची झाली आहे.
मुंबई : भाजप आणि ठाकरे गटात शीतयुद्ध सुरूच असून, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘अशी चूक केली तर तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही...’ असे म्हणत खासदार सावंत यांच्यावर शरसंधान केले आहे. अरविंद सावंत यांनी बावनकुळे यांच्यावर टीका करताना ते ‘बावनखुळे’ आहेत, असे म्हटले होते. यावर प्रसाद लाड यांनी हे उत्तर दिले आहे.
कालपरवापर्यंत घरी बसलेले आणि झोपी गेलेले जागे झाले आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत तुमची झाली आहे. तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत बोलत असताना तोंड सांभाळून बोलावे, ही माझी तुम्हाला विनंती आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तुमचे बॉस घरातून कधी बाहेर पडले नाहीत. मानेला पट्टे लावून फिरले. आता तुम्ही सांगता आम्ही बाहेर पडलो, असे लाड यांनी सुनावले आहे.
निर्वाणीचा इशारा
बावनकुळे हे महाराष्ट्राचे नेतृत्व असून, ते भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे अरविंद सावंत तुम्हाला मी ‘साहेब’ म्हणत आहे. मात्र, यापुढे जर अशी चूक केली, तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही लाड यांनी दिला आहे.