Join us

भाजपा आमदार सरदार तारा सिंग यांची गाडी थेट पोलीस चौकीत घुसली, हेड कॉन्स्टेबल जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 2:31 PM

भाजपा आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीचा अपघात झाला असून गाडी थेट पोलीस चौकीत घुसल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सरदार तारा सिंग भाजपाचे मुलुंडमधील आमदार आहेत. गुरुवारी रात्री हा अपघात झाला.

ठळक मुद्देसरदार तारा सिंग यांच्या गाडीचा अपघात झाला असून गाडी थेट पोलीस चौकीत घुसलीअपघातात पोलीस कर्मचा-यासहित गाडीचा चालक महेंद्र गुप्तादेखील जखमी झाला आहेअपघात झाला तेव्हा सरदार तारा सिंग गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहेनाहूर येथील सोनापूर सिग्नल जवळ हा अपघात झाला

मुंबई, दि. 15 - भाजपा आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीचा अपघात झाला असून गाडी थेट पोलीस चौकीत घुसल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सरदार तारा सिंग भाजपाचे मुलुंडमधील आमदार आहेत. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा सरदार तारा सिंग गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहे. अपघातात पोलीस कर्मचा-यासहित गाडीचा चालक महेंद्र गुप्तादेखील जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. 

गुरुवारी रात्री सरदार तारा सिंग यांच्या महिंद्रा एक्सयूव्ही गाडीने भरधाव वेगात असताना एका स्विफ्ट गाडी आणि दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट जवळच असणा-या ट्रॅफिक पोलीस चौकीला धडकली. अपघात झाला तेव्हा सरदार तारा सिंग गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहे. तारा सिंग यांचा चालक महेंद्र गुप्ता ही गाडी चालवत होता. घटना नाहूर येथील सोनापूर सिग्नल जवळ हा अपघात झाला. 

गाडीने जेव्हा पोलीस चौकीला धडक दिली तेव्हा हेड कॉन्स्टेबल उमेश ईशी चौकीत बसलेले होते. गाडी थेट पोलीस चौकीत घुसल्याने उमेश ईशी जखमी झाले आहेत. चालक महेंद्र गुप्ता हादेखील जखमी झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

अपघातामध्ये रस्त्यावरील 2 कुत्रेही ठार झाले. अपघात इतका जबरदस्त होता की, पोलीस चौकी पूर्णतः कोसळली आहे. आता हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

टॅग्स :अपघातभाजपापोलिसमुंबई पोलीस