मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 08:14 PM2020-07-17T20:14:15+5:302020-07-17T20:14:28+5:30
मुंबईत दि, 15 जुलै पर्यंत 4,08,320 कोरोना चाचण्या केल्या आहेत, याचा अर्थ असा आहे की दि,22 मार्चपासून आम्ही दररोज सरासरी 3550 परीक्षा घेतल्या आहेत.
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अजून कोरोना आटोक्यात आला नाही.तर दुसरीकडे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे आणि शहरात साथीचे रोग पसरले आहे, असा दावा केला आहे. सदर दावा अत्यंत चुकीचा असून मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी रोज किमान 8 ते 10 हजार चाचण्या पालिकेने केल्या पाहिजेत अशी मागणी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपाआमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे केली आहे. येत्या ऑगस्टच्या मध्यभागी परिस्थितीचा आढावा घ्या आणि मग मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे, या निष्कर्षांवर आपण पोहोचा, असा टोलाही त्यांनी आयुक्तांना लगावला.
मुंबईत दि, 15 जुलै पर्यंत 4,08,320 कोरोना चाचण्या केल्या आहेत, याचा अर्थ असा आहे की दि,22 मार्चपासून आम्ही दररोज सरासरी 3550 परीक्षा घेतल्या आहेत. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दररोज सुमारे १०,००० चाचण्या घेण्याची क्षमता असताना दररोज किमान १०,००० चाचण्या घेण्यावर भर दिला आहे. शहराच्या मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा 5..67% जास्त आहे .तर मुंबईत जून महिन्यातच तब्बल 3175 मृत्यू आणि जुलैच्या पहिल्या 15 दिवसात 910 मृत्यू झाले हे गंभीर व धोकादायक आहे आणि शहरातील साथीच्या रोगांमुळे मृत्यू चे प्रमाण वाढले हा आयुक्तांचा दावा म्हणजे विरोधाभास आहे अशी टिका त्यांनी केली. देशातील एकूण मृत्यूंपैकी 23% लोक मुंबईत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.कोरोना विषाणू अत्यंत अनिश्चित आहे. त्यामुळे शहराच्या हितासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणे हे गरजेचे आहे असा दावा आमदार अमित साटम यांनी शेवटी केला.