अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर भाजप आमदारांनी काढला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:00 PM2021-10-05T15:00:58+5:302021-10-05T15:01:11+5:30
अंमली पदार्थ विक्री आणि वाढती गुन्हेगारी थांबवा, भाजप आमदारांची मागणी
कल्याण-कल्याण परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे. हे प्रकार लवकरात लवकर थांबवा या मागणीसाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलिस अधिका:याची भेट घेतली.
या मोर्चात कल्याण भाजप अध्यक्ष संजय मोरे, भाजपचे माजी उपमहापौर विक्रम तरे, परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष म्हस्के, महिला आघाडीच्या प्रिया जाधव. वंदना मोर,े मीना कोठेकर, अर्चना नागपुरे, नीता सिंग पदाधिकारी आदी भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
आमदारांच्या नेतृत्वाखाली काटेमानिवली पूलाजवळ वाढती गुन्हेगारीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच कार्यकत्र्यानी जोरदार घोषणाबाजी केली. पूलापासून पोलिस ठाण्यार्पयत मोर्चा काढण्यात आला. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हेगारांचे मित्र असून गुन्हेगारांसोबत ते मद्यप्राशन करीत असल्याचा गंभीर आरोपही आमदार गायकवाड यांनी यावेळी केली. मात्र निवेदन घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक पोलिस ठाण्यात काही कारणास्तव उपस्थित नव्हते. त्यामुळे आमदारांच्या गंभीर आरोपाविषयी त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस अधिका:यांच्या भेटीसाठी काही दिवसापूर्वी आले होते. त्यावेळीही कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थाची विक्री केली जाते याकडे आमदार गायकवाड यांनी पोलिस अधिका:यांचे लक्ष वेधले होते.