मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून, त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगाचा बॅनर ट्विट केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट हा राज ठाकरेंचा फोटो असलेला भगव्या रंगातील बॅनर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामुळे मनसे खरंच पक्षाच्या झेंड्याचाही रंग अशाच प्रकारे बदलणार का?, याची चर्चा आता सुरू आहे.
मनसे, भाजपाची युती होणार?; राजू पाटील यांनी केलं मोठं विधानदरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा बाणा जपणे अवघड जाणार आहे. ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी मनसेने आपल्या मूळ विचारधारेकडे परतावे, अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. २३ जानेवारीच्या पक्षाच्या मेळाव्यात याबाबत काही भाष्य होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.
राज-फडणवीस भेटीवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे नवे राजकीय संकेत; म्हणाले की...