मुंबई: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांपैकी भाजपने चार राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करत आहे. यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेना राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यासह शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. या आरोपांवर संजय राऊत यांनीही पलटवार केला. यातच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पियानो वाजवला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हार्मोनियम वाजवली होती. भाजप नेते मोहित कंबोज यांनी हीच आठवण राऊतांना करून दिली आहे. मोहीत कंबोज यांनी संजय राऊतांचा एक फोटो ट्विट करत टीका केली आहे.
अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई
जावेद भाई अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, सलीम-जावेद का साथ टूटने नहीं देंगे!, असे ट्विट मोहित कंबोज राऊतांना उद्देशून केले आहे. मोहित कंबोज सुरुवातीपासूनच नवाब मलिक आणि संजय राऊतांचा उल्लेख जावेद सलीम असा करतात. त्यापैकी नवाब मलिक आता ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊतांनी हार्मोनियम पॅक करावे कोठडीत मलिकांना गााणे ऐकवायचे आहे. अशा अर्थाचे मोहित कंबोज यांनी केल्याने ट्विट आता चांगलेत व्हायरल होत आहे. यामुळे आता संजय राऊत यांना अटक होणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो. हे खरे आहे. पंजाबमध्ये भाजप एक राष्ट्रीय पक्ष असूनही पराभूत झाला. याचेही उत्तर भाजपने द्यावे. आम्हाला नोटांपेक्षा कमी मते मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय प्राप्त झाला असला तरी विजय पचवणे भाजपने शिकले पाहिजे. पराभव पचवणे अनेकदा सोपे असते पण काहींना विजय पचवता येत नाही. मतदारांनी दिलेला विजय पचवा आणि सुडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, देशाचे आणि राज्याचे हित पाहा इतकेच मी सांगतो असेही संजय राऊत यांनी सांगितले.