Join us

“...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 6:14 PM

Narayan Rane PC News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

Narayan Rane PC News:शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत, सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत. जातीजातीत भेद निर्माण करत आहेत. चारवेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मंत्री असताना, त्यांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवली नाही आणि आता वाढवू म्हणता. ही भांडणे तुम्हाला अभिप्रेत आहेत का, पुतळा पडला त्यापेक्षा चांगला देखणा पुतळा आपण तयार करुया. असे बोलला असतात तर तुमची कीर्ति वाढली असती. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही राजकारण करत आहात. वयाच्या ८३ व्या वर्षापर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत, असे सांगत भाजपा खासदार नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. मला फोन करुन शिवीगाळ करणारा शरद पवारांचा कार्यकर्ता निघाला. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा हे पवारांच्या ध्यानीमनी असायला हवे. शरद पवारांनी बोलायला हवे की, वाद नको. मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो. आपण नव्याने पुतळा उभारावा. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचे आणि काडी घेऊन फिरायचे, याला महाराष्ट्रात स्थान नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण करता? उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्हाला काही वाटत नाही? संजय राऊत भडकवण्याचे काम करत आहेत. ते वातावरण बिघडवत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गेट आऊट फ्रॉम इंडिया म्हणणारे कोण आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण? हा कसा नेता होऊ शकतो? याअगोदर पुण्यातही एक घटना घडली होती, तेव्हा झोपले होते का? आता निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी? मी जवळून पाहिले आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

दरम्यान, एकतर पाय झिजवता, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मलाच मुख्यमंत्री करा, असे म्हणतात. लाज पण वाटत नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.  

टॅग्स :नारायण राणे शरद पवारउद्धव ठाकरे