शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला... आशीष शेलारांचा मनसेला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 11:12 AM2019-04-01T11:12:36+5:302019-04-01T11:18:54+5:30
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. आशीष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी पुन्हा एकदा ट्विट केले आहे.
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकाजवळ येतील तसतसे राजकीय वातावरणही चांगलेच तापत आहे. यातच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. आशीष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी पुन्हा एकदा ट्विट केले आहे.
दोन दिवसांपूर्वी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्यासोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मनसैनिकांसह सहभागी झाले. यावरुन आशीष शेलार यांनी शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला असे सांगत मनसेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटवरुन पुन्हा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणाले,
'शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला..
गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..
पण उपयोग काय?
शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,
बाकी शुन्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला
तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?'
शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला..
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) April 1, 2019
गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..
पण उपयोग काय?
शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय,
बाकी शुन्यच !
नाही आले “एकनाथराव” भेटीला
तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?#ChowkidarकेSideEffects
दरम्यान, याआधी आशिष शेलार यांनी केलेले ट्विट मनसेला चांगलेच झोंबले होते. यावर मनसेने त्यांना 'काळजी करू नका शेलार भाऊ' म्हणत त्यांना हुकलेल्या मंत्रिपदाचीही आठवण करून दिली.
या ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले
म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..
पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन..
बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!”,
एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” असा टोलाही शेलारांनी लगावला होता.
सोडून गेले नगरसेवक...सोडून गेले आमदार...एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी "फक्त लढ" असे म्हटले.!!
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) March 28, 2019
"शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे"#ChokidarकेSideEffects
त्यावर मनसेने मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर...
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर...
त्रिफळा उडवू मोदी-शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील...
काळजी करू नका शेलार भाऊ,
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील...
मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर...
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 28, 2019
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर...
त्रिफळा उडवू मोदी-शहांचा,
गोलाकार खेळाडू तुमचे थकतील...
काळजी करू नका शेलार भाऊ,
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील...#हुकलेलंमंत्रिपद