भाजपा सरस; १३पैकी ७ विजयी
By admin | Published: February 25, 2017 03:37 AM2017-02-25T03:37:17+5:302017-02-25T03:37:17+5:30
गेली ५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या के(पश्चिम) विभागात भाजपाची या पालिका निवडणुकीत सरशी झाली आहे. या विभागात भाजपाचे १३पैकी ७ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले
मनोहर कुंभेजकर, मुंबई
गेली ५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या के(पश्चिम) विभागात भाजपाची या पालिका निवडणुकीत सरशी झाली आहे. या विभागात भाजपाचे १३पैकी ७ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले. तर शिवसेनेचे ३, काँग्रेसचे २ आणि १ अपक्ष उमेदवार विजयी झाला. या विभागात प्रभाग ६०मध्ये विजयी झालेले भाजपाचे योगीराज दाभाडकर आणि ६८मध्ये विजयी झालेले भाजपाचे रोहन राठोड हे दोन तरुण चेहरे जायंट किलर ठरले.
प्रभाग ६०मध्ये शिवसेनेचे उमेदवार यशोधर (शैलेश) फणसे यांचा भाजपाचे तरुण उमेदवार योगीराज दाभाडकर यांनी पराभव केला. तर काँग्रेसच्या नगरसेविका ज्योत्सना दिघे यांनाही येथे पराभव पत्करावा लागला. प्रभाग ६८मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले देवेंद्र आंबेरकर यांचा भाजपाचा तरुण चेहरा असलेल्या रोहन राठोड यांनी पराभव केला.
अंधेरी(प.) विधानसभा क्षेत्रात भाजपाचे ५ तर काँंग्रेसचे २ असे एकूण ७ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले. वर्सोवा विधानसभा क्षेत्रात भाजपाचे २, शिवसेनेचे ३ आणि अपक्ष १ असे एकूण ६ उमेदवार विजयी झाले. या विभागात भाजपाची सरशी झाल्यामुळे आता येथे भाजपाचा प्रभाग समिती अध्यक्ष होणार आहे.
निवडून आलेले नगरसेवक
प्रभाग ५९ : प्रतिमा खोपडे (शिवसेना)
प्रभाग ६० : योगीराज दाभाडकर (भाजपा)
प्रभाग ६१ : राजुल पटेल (शिवसेना)
प्रभाग ६२ : चंगेज मुलतानी (अपक्ष)
प्रभाग ६३ : रंजना पाटील (भाजपा)
प्रभाग ६४ : शाहिदा खान (शिवसेना)
प्रभाग ६५ : अल्पा जाधव (काँग्रेस)
प्रभाग ६६ : मेहेर हैदर (काँग्रेस)
प्रभाग ६७ : सुधा सिंग (भाजपा)
प्रभाग ६८ : रोहन राठोड (भाजपा)
प्रभाग ६९ : रेणू हंसराज (भाजपा)
प्रभाग ७० : सुनीता मेहता (भाजपा)
प्रभाग ७१ : अनिस मकवानी (भाजपा)